Posts

Showing posts from 2025

तु-- कविता

 तु, कधी गम, कधी सरगम, कधी हास्य, कधी स्मितहास्य, कधी शांत वारा, तर कधी अश्रुंच्या धारा. कधी चंचल, कधी ज्वाला, कधी हळवा एक कोना, कधी शांत, कधी प्रशांत, तर कधी हास्याचा फवारा. कधी साद, कधी प्रतिसाद, कधी रुसवा ,कधी फुगवा  कधी गोड असा संवाद, तर कधी टोकाचा विसंवाद. तु अशी, तू तशी  मी असा, मी तसा, आपुल्या दोघांची जमलीय, रेशीम गाठ